अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी , पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : अल्पवयीन भाचीला जबरदस्तीने अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या मावशीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मावशी आणि तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली.

लॉकडाऊनच्या काळात मावशी आणि तिचा बॉयफ्रेंड आपल्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करत असल्याचा आरोप आहे. एप्रिल महिन्यात पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला. पीडित मुलीने धीर एकवटत आपल्या आईला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहीण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

नेमकं काय घडलं?

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सुरु असताना पीडित मुलीची आई आपल्या चार मुलांना बहिणीकडे सोडायची. यावेळी मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मावशी आणि तिचा प्रियकर इच्छेविरोधात तिला अश्लील चित्रफीत दाखवत होते. मुलीने इतके महिने या प्रकरणी वाच्यता केली नव्हती. परंतु जवळपास चार महिन्यांनी हिंमत दाखवत तिने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली, असे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.

दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कोरोना चाचणी केली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली, मात्र कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासन आरोपींना दाखल करुन घेत नसल्याची माहिती आहे.

दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून सध्या या आरोपींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago