Categories: Uncategorized

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविजय- २०२४’ करीता युवा वॉरियर्सची भक्कम फळी सज्ज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑक्टोबर) : मावळ लोकसभा क्षेत्रात सुमारे ३५० हूनअधिक घरी जाण्याचा आमचा संकल्प आहे. एकूण ११ राजकीय पक्षांची महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४५ जागा प्रचंड बहुमताने जिंकेल. सर्वच बूथवर आम्हाला ५१ टक्के मते मिळतील. निवडणुकीत ज्या पक्षांकडे जागा जातील, त्या प्रत्येक ठिकाणी भाजपा आणि मित्रपक्ष एकजुटीने लढून विजय मिळवू, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

पिंपरी- चिंचवड शहर भाजपाच्या वतीने ‘महाविजय- २०२४’ अंतर्गत ‘घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमरजी साबळे, आमदार प्रशांतजी ठाकूर, प्रभारी वर्षा डहाळे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिवजी खाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माऊली थोरात, दक्षिण भारतीय प्रकोष्ठ संयोजक राजेश पिल्ले, प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा गणेश भेगडे, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, पिंपरी विधानसभेचे प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, भोसरी विधानसभा प्रमुख विकास डोळस, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, शैला मोळक, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, रवींद्र भेगडे तसेच भाजपा सर्व मा.नगरसेवक, मा.नगरसेविका, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पेजप्रमुख, युवा वॉरियर्स उपस्थित होते. भाजपा सर्व सरचिटणीस आणि मोर्चा अध्यक्षांनी आयोजनात पुढाकार घेतला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील ‘भाजपा वॅारियर्स’ शी संवाद साधला. ‘घर चलो अभियान’ अंतर्गत पिंपरी, राधिका चौक येथून अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, शगुन चौक व साई चौक परिसरातील‍ नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरीकांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांनी देखील पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच नावाला पसंती दर्शविली.

‘नारीशक्ती वंदन’ या विषयावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठीचे आरक्षण विधेयक पास करून घेतले आहे. देशावर जेव्हा संकट आले, तेव्हा महिलांनी कणखरपणा दाखविला. आता देखील लोकसभेत १९१, तर विधानसभेत सुमारे १०० महिलांना संधी मिळणार आहे.

राम मंदीर उभारले… आता कसं वाटतंय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राममंदीर संदर्भातील सर्व अडथळे दूर केले व गतवर्षीपासून भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाल्याचे सांगितले. सन २०२४ च्या जानेवारी महिन्यात हे मंदीर सर्वांसाठी खुले होणार आहे. यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, ज्यावेळी आम्ही राममंदिरासाठी भांडत होतो, त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी लाल कृष्ण आडवाणी यांना ‘मंदिर वही बनाएंगे, मगर तारीख नाही बताएँगे’असे म्हणताना टिंगल केली होती. त्या कॉंग्रेसच्या नेत्यांना ‘आता कसं वाटतंय’ असे म्हणत चिमटा काढला.  

केंद्र सरकारच्या उपलब्धीची उजळणी…
घर चलो अभियानाच्या समारोपाच्या छोटेखाणी सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने मागील ९ वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची आठवण करून दिली. यामध्ये तीन तालाख, राममंदीर, नारी शक्ती वंदन, नुकतीच सुरु झालेली विश्वकर्मा योजना आदी विषयांचा धावता आढावा यावेळी बावनकुळे यांनी घेताना उपस्थितांना त्यानी केलेल्या मतदानामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे जोरदार स्वागत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज शहरात शहर भाजपाच्या ‘घर चलो’ अभियानासाठी आले होते. त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील महिला कार्यकर्त्यानी देखील भगवे फेटे बांधताना अभियानाचा उत्साह वाढविला. शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सुमारे ३० फुटांचा हार देखील घालण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

नागरिकांची पुन्हा मोदींनाच पसंती…
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मावळ लोकसभा प्रवास या दरम्यान घाटाच्या खाली व घाटाच्या वर अशा दोन्ही ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. आज पिंपरी येथील शगुन चौक, साई चौक, राधिका चौक या व्यापारी भागातील नागरिकांना भेटले. मोठी बाजारपेठ असणाऱ्या या भागातील नागरिकांनी देखील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी बावनकुळे यांनी आगामी प्रधानमंत्री म्हणून तुम्ही कुणाकडे पहाता असा प्रश्न केला असता, सर्वच नागरिकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच पुन्हा प्रधानमंत्री होतील असे आत्मविश्वासाने आणि जोशात सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

महाराष्ट्राचा 58 व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ …. पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 :  महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…

9 hours ago

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

4 days ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

1 week ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

1 week ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

1 week ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

1 week ago