महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन वर्षांतील पावसाची स्थिती लक्षात घेता कमी वेळात अधिक पाऊस असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मान्सून पूर्व कामे वेगाने सुरु असून त्यामध्ये सद्यस्थितीला समाधानकारक कामे चालू आहेत.
शहरातील पिंपळे गुरव आणि आसपासच्या परिसरात मागील तीन वर्षात झालेल्या जोरदार पाऊसामुळे ओढे-नाले यांच्या बाजूला राहणार्या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रभाग क्रं.३१ पिंपळे गुरव मधील एम के चौक ते मयूर नागरी दरम्यानच्या संरक्षण विभागाच्या सीमाभिंतीच्या कामाची पाहणी करण्यात आली.

चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शना खाली बरीच वर्ष भेडसवणाऱ्या मिलिटरीच्या भिंती मधील तुंबनाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. भिंती लगत नाल्याचे पाणी एम के हॉटेल मार्गे एम एस काटे चौकाकडे नदी ला जोडून कवडेनगर, एम. के. हॉटेल, विनायक नगर, गुरुदत्त कॉलनी, साईनाथ कॉलनी, नंदनवन कॉलनी आदी परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या अडचणीला त्यामुळे पूर्णविराम मिळणार आहे.
या कामाची पाहणी माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले यांनी केली. कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी संबंधितांना दिले आहेत. जेणेकरून तेथील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये’, असेही माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अशोक भालकर, महापालिका स्मार्ट सिटी मनोज सेठिया, अनिकेत बोठे इंजिनियर स्मार्ट सिटी, गणेश देशपांडे, श्रीकांत बेंडे, शैलेश जाधव आणि परिसरातील नागरिकही उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी सद्यस्थिती जाणून घेतली असून पावसाळ्याच्या दिवसात ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या आणि पाणी गेल्याच्या घटना मागील वर्षी घडल्या आहेत. तिथे अधिकार्यांनी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आदेश देण्यात आले आहेत.
54 Comments