Google Ad
Editor Choice

डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने … रंगली सांगवी आणि परिसरामधील विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनविण्याची पर्यावरण पूरक कार्यशाळा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ ऑक्टोबर) :  आमदार लक्ष्मण  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर आणि कृष्णा रघुनाथ भंडलकर यांनी सांगवी आणि परिसरामधील विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनविण्याची पर्यावरण पूरक कार्यशाळा डॉल्फिन स्कूल सांगवी या ठिकाणी दिनांक 31 ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत घेण्यात आली.

यावेळी सांगवी परिसरातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला. तसेच पालकांनी ही अतिशय भरघोस प्रतिसाद देत, सारिका कृष्णा भंडलकर यांनी हा उपक्रम राबविल्या बद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी हा पर्यावरण पूरक उपक्रम राबवला ज्यामध्ये मुलांचे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्जनशील गुण यामध्ये वाढीस लागतील.

Google Ad

मुलांनी आपल्या स्वतःच्या हाताने आपली परंपरा, संस्कृती जपण्यासाठी आकाश कंदील स्वतःच्या हातांनी बनवून तो आपल्या घरी दीपावलीच्या सजावटीत लावण्याचा आनंद मुलांसाठी काही वेगळाच असणार आहे. पालकांनीही अशा कार्यशाळा मुलांसाठी झाल्या पाहिजेत, आणि आमदार लक्ष्मण जगताप मार्गदर्शनाखाली आणि सारिका कृष्णा भंडलकर आकाश कंदील कार्यशाळेचा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सर्व साहित्य सारिका कृष्णा भंडलकर यांच्या कडून मोफत देण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

167 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!