Google Ad
Uncategorized

डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे १३२ व्या जयंती निमित्ताने …’ जागरूक पालक सुदृढ बालक’- अभियान अंतर्गत बालकांची नेत्र तपासणी

महाराष्ट्र 14 न्यूज, ((दि. १४एप्रिल) : डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून पुणे अंधत्व नियंत्रण समिती, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK जिल्हा रूग्णालय पुणे, सेठ ताराचंद धर्मार्थ रूग्णालय पुणे, नेत्र सेवा प्रतिष्ठान पुणे यांचे संयुक्त विद्यमाने जागरूक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ६-१८ वयोगटातील सर्व बालकांची तपासणी पश्चात नेत्र तपासणी मध्ये आढळून आलेले तिरळेपणा, Ptosis (पडलेली पापणी), मोतिबींदू ई नेत्र विकारांची शस्त्रकिया शिबीर शुक्रवार दि १४/४/२३ ते रविवार दि १६/४/२३ अखेर ३ दिवस आयोजीत केले आहे.

सदर शिबिरात शस्त्रक्रिया ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॅा मधुसूदन झंवर, डॅा रमेश भांगे व सहकारी करणार आहेत. शस्त्रक्रिया शिबिरात पुणे जिल्हा ग्रामीण व शहरी भागातून एकुण ४४ रूग्ण सहभागी झाले होते अभियान काळात नेत्र शिबीर आयोजन यशस्वीरित्या पार पाडणे करीता डॅा नागनाथ यमपल्ले जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शन खाली डॅा प्रकाश रोकडे जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती कार्यक्रम व्यावस्थापक तथा जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, सर्व अधिकारी कर्मचारी RBSK पथक , शेठ ताराचंद धर्मार्थ रूग्णालय पुणे मधील सर्व वैद्यकिय अधिकारी /कर्मचारी पार पाडणार आहेत . आज दि १४/४/२०२३ रोजी दाखल एकुण ३१ रूग्णापैकी ५ Ptosis रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॅा रमेश भांगे यांनी केली आहे

Google Ad
Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!