Categories: Uncategorized

पावसाळापूर्व कामांसाठी मनपा अधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’; नवी सांगवीत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी घेतला समस्याचा आढावा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जून) : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. याकरिता शहरातील नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागातील पावसाळी पूर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावा. कवडे नगर, विनायक नगर( त्रिमूर्ती कॉलनी) या भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला , यावेळी त्यांनी नागरी आरोग्याच्या दृष्टीने साथीचे रोग प्रतिबंधक औषध फवारणी करावी, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता कामे झाली पाहिजेत अशा सूचना भाजपा दिल्या आहेत.

यावेळी नवी सांगवीतील गणेश नगर, समता नगर, फेमस चौक, साई चौक, स्वामी विवेकानंद नगर, आदर्श नगर, पिंपळे गुरव मधील कवडे नगर, त्रिमूर्ती कॉलनी आदी परिसरातील पावसाळा पूर्व कामे नाला सफाई , पावसाच्या पाण्याच्या चेंबरची सफाई आणि प्रलंबित विकासकामे याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी साई चौक येथील भाजी मंडई ची पाहणी करून तेथील विक्रेत्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या.

नालेसफाई, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, विधुत विभाग, रस्ते खोदाई नियमावलीची अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी ८ दिवसांत रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करावीत, तसेच पथदिवे आणि साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध फवारणी करावी, यासाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोणातून कार्यवाही करावी
असे आदेश मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी प्रभागातील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनीही काही सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांना केल्या त्याची दखल जगताप यांनी घेत अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या.

यावेळी पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व विभागाचे अधिकारी तसेच माजी नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिवस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) :रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्य सन…

18 hours ago

चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२३ जून) : चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या…

4 days ago

जागतिक योग दिन जिल्हा आयुष रुग्णालयात उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : औंध जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या जिल्हा आयुष रुग्णालयात आज २१…

5 days ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण…

1 week ago

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड मधील यशस्वी उद्योजक श्री.बबनराव येडे आबांना अमृत महोत्सवी वर्षाच्या दिल्या शुभेच्छा…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील  पिंपळे निलख येथील उद्योजक श्री.बबनराव बाबुराव…

1 week ago