Google Ad
Uncategorized

दोन गटातील वादामध्ये कड्यावरून साडेसातशे फूट दरीत पडून दोन युवकांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जुलै) : एकीव, ता. जावळी धबधब्यापासून साताऱ्याच्या दिशेकडील डाव्या बाजूस साधारण पन्नास मीटर अंतरावर साडेसातशे फूट खोल दरीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा स्थानिकांच्या मदतीने पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून वर काढले.

जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी साताऱ्यातील युवकांचे दोन ग्रुप आले होते. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान दोन्ही गटांत वादावादी होऊन धबधब्यापासून साताऱ्याच्या दिशेला डावीकडील बाजूस साधारण पन्नास मीटर अंतर परिसरातील साडेसातशे फूट खोल दरीत दोन युवक कोसळले. यामध्ये अक्षय शामराव आंबवणे (वय २८, बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) तसेच गणेश फडतरे (वय ३५, करंजे, ता. सातारा) हे दोन युवक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तरुणांच्या वादावादीतून ढकलून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Google Ad

या घटनेची माहिती मिळताच पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमद्वारे रात्री उशिरा शोधमोहीम सुरू केली. दाट झाडीझुडपे, किर्रर्र अंधारात मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेत व्यत्यय येत होता. दरम्यान, रात्री दीड वाजता मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांना यश आले. या घटनेची मेढा पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!