महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्याकरीता दुचाकी करणारे आरोपींचा शोध घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत विशेष मोहीम आखुन त्याप्रमाणे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि, सचिन चव्हाण व तपास पथकातील अंमलदार यांना वाहन चोरी गुन्हे करणारे आरोपीचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथके तयार करुन दुचाकी चोरी करणारे गुन्हेगारांची माहीती काढण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील यांना विश्वासु | बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तापकीर मळा चौक येथे एक मोटार सायकल चोर हा चारीची मोटार सायकल विक्री करीता येणार आहे त्या बातमीप्रमाणे सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व त्यांचे पथक यांनी सापळा रचून संशयीत इसम नामे नितीन राजेंद्र शिंदे, वय २० वर्षे, रा. शेकापुर शिंदेवस्ती, ता. आष्टी, जि. बिड यास त्याचे ताब्यातील हाडा शाईन मो.सा. नं. एमएच २४ एएच १५२० सह शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचेकडे तपास करता त्याचेकडे मिळालेली मोटार सायकल ही त्याने रहाटणी भागातून चोरी केली असल्याचे व त्याबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २३२ / २०२३ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे त्यास अटक करुन त्याचेकडे अधिक तपास करुन त्याचे साथीदार मुख्य सुत्रधार आरोपी केशव महादेव | पडोळे वय २५ वर्षे रा. दादा बोडके यांचे खोलीत भाडयाने बोडकेवाडी, माण ता. मुळशी जि. पुणे मूळ रा. केळसांगवी | ता. आष्टी जि.बिड याचेसह त्यांचे इतर साथीदार नामे १) नवनाथ सुरेश मुटकुळे वय २४ वर्षे रा. बालाजी कॉलनी, सगर यांचे खोलीत भाडयाने थेरगाव पुणे मुळ रा. करंजी ता. पाथर्डी जि.अहमदनगर, २) ऋषीकेश अजिनाथ भोपळे वय २३ वर्षे रा. पारगाव जोगेश्वरी ता. आष्टी जि.बिड, ३) अमोल दगड पडोळे वय २४ वर्षे रा. केळसांगवी ता. आष्टी जि. बिड यांना वेगवेगळया ठिकाणावरुन पकडून त्यांना अटक करण्यात आले आहे..
त्यांचेकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्यांचेकडुन वाकड पो.स्टे. हद्दीतील एकूण १४ हिंजवडी पो.स्टे. हद्दीतील ०४ बारामती तालुका पो.स्टे. हद्दीतील ०७ राजणगाव पो.स्टे. हद्दीतील ०३ गुन्हे, अहमदनगर कॅम्प पो.स्टे. हद्दीतील ०२, बारामती शहर, बालुंज एमआयडीसी, पाथर्डी, कोतवाली, कर्जत, श्रीगोंदा पो.स्टे. कडील प्रत्येकी ०१ असे एकूण ३६ गुन्हे केल्याचे उघडकीस आणले असून सदर गुन्हयातील ३६ मोटर सायकल व इतर ०७ चोरीच्या मोटार सायकल अशा एकूण ४३-चोरीच्या मोटर सायकल मिळुन किं. रु. २१.५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेला आहेत.
उघड ३६ गुन्हयांव्यतिरिक्त त्यांचकडुन हस्तगत केलेल्या इतर ०७ मोटर सायकल पुढील प्रमाणे :
१) बजाज प्लॅटीना MH 12 GY 5650 २) मेस्ट्रो MH 14 GP 4416, ३) बजाज पल्सर MH 14 AA 9679, ४) हिरो | स्प्लेण्डर MH 31 BD 3608, ५) होंडा युनिकॉर्न MH 14 HF 6391, ६) होंडा शाईन MH 12 MK 5481, ७) होंडा अॅक्टिवा MH 23 AZ 3373
गुन्हयाचे तपासामध्ये असे दिसून आले आहे की, आरोपी मोटर सायकल चोरुन त्या परजिल्हयात विकत होते व काही नागरीक मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता स्वस्तामध्ये मिळतात म्हणुन चोरीच्या मोटर सायकल विकत घेत आहेत.
चोरीच्या मोटार सायकल आहेत हे माहित असतानाही ते विकत घेतल्यामुळे गुन्ह्यात भादंवि कलम ४११ चा अंतर्भाव करुन एकूण १७ इसमांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी दक्ष व जागरुक राहून मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता कोणतेही वाहन विकत घेवु नये तसेच कोणी अशा प्रकारे कागदपत्रे नसताना मोटर सायकल विकत असल्याबाबतचा प्रकार निदर्शनात आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…