Google Ad
Editor Choice

वाघोली उबाळे नगर परिसरातील तलावात १५ वर्षीय २ मुलांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मार्च) : पुणे महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मधील वाघोली उबाळेनगर परिसरात असणाऱ्या तलावात १५ वर्षीय २ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ( दि . १० ) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली . दोन्ही मुलांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी पाणबुड्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले .

मनोज मंगेश सातपुते ( वय १५ ) , जयराज रामकिशन टाक ( वय १५ . दोघेही रा . थिटे वस्ती , खराडी ) असे तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत . याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार , उबाळेनगर येथील तलावात पोहण्यासाठी ७ ते ८ मुलांचा ग्रुप पोहण्यासाठी आला होता . यापैकी दोघेजण तलावाच्या पाण्यात बुडाले .

Google Ad

सदरची घटना घडल्यानंतर लोणीकंद पोलीस , वाघोली पीएमआरडीए व पुणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान मृतदेह शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते . रात्री उशिरापर्यंत मृतदेह मिळाले नाही . सकाळी ८ च्या सुमारास निखील शिवतारे , ऋषिकेश शिवतारे , दीपक निषाद यांच्या पथकातील पाणबुड्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!