Google Ad
Editor Choice

ट्विटरची सेवा जगभरात ठप्प, लॉगइन करताना येतेय ‘ही’ समस्या..

 

📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://maharashtra14news.com/

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ डिसेंबर) :  मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा ठप्प झाल्याचे समोर येत आहे. आज (ता. 29 डिसेंबर) सकाळपासून ट्विटर सेवा खंडीत असल्याची अनेक युजर्सना समस्या जाणवली. काही यूजर्सने म्हटलं की, लॉगइन असलेले अकाउंट आपोआप बंद झाले, त्यानंतर लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तर लॉगइन होत नाही. त्यानंतर काही वृत्तसंस्थानी देखील ही बातमी दिली आहे.

Google Ad

💁🏻‍♂️ प्राप्त माहीतीनुसार, ट्विटर वापरणारे युजर्स अजूनही लॉग इन करु शकलेले नाही. भारतातसुद्धा लाखो ट्विटर युजर्सना आज सकाळी लॉगइन करताना समस्या जाणवली आहे. त्यांनी लॉग इन करताच एरर दाखवत असल्याचं म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हापासून इलॉन मस्क यांच्या हाती ट्विटर आले त्यानंतर जगभरात ट्विटर बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे.

🔐 ट्विटर ॲप्लिकेशन आणि साईट दोन्हीना समस्या येत असल्याचे काही यूजर्सने सांगितले आहे. आज सकाळी 7 वाजेपासून लाखो युजर्सना लॉगइन करताना ‘Something went wrong, but don’t fret — it’s not your fault. Let’s try again.” असा मेसेज समोर दिसत आहे आणि रिफ्रेश करण्यास सांगितलं जात आहे. पण हे केल्यानंतरही अकाऊंट लॉगइन होत नाही.

🔎 ‘डाऊन डिटेक्टर’ वेबसाइटनुसार दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता सोबतच अनेक शहरांत आज सकाळीच आउटेज नोंदवले गेले. जगभरातील युजर्सना सकाळी 6 वाजेनंतर ट्विटरबाबत समस्या येऊ लागल्या. युनायटेड स्टेट्स, बर्टेन, कॅनडा आणि फ्रान्स यांचा समावेश असलेल्या इतर देशांमध्येही असणाऱ्या युजर्सना समस्या आल्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा._ 👉 https://maharashtra14news.com/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 महाराष्ट्र 14 न्यूज च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 9881100300

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!