महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ४ जानेवारी २०२३ :- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आज महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत आमदार जगताप यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक राजू बनसोडे, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहशहर अभियंता आबासाहेब गलबले, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, दिगंबर चिंचवडे, नितीन समगीर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती तसेच महापौरपदही भूषवले. शिवाय ते विधान परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. सध्या ते चिंचवड विधानसभेचे विद्यमान सदस्य होते. त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.