महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जुलै २०२३: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते जिजाऊ पर्यटन केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, स्थापत्य उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, उपअभियंता राजेंद्र क्षीरसागर, उद्यान निरीक्षक दत्तात्रेय आढळे तसेच उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजना बो-हाडेवाडी, मोशी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता रामदास तांबे,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,कार्यकारी अभियंता अनघा पाठक, उप अभियंता सुनील दांगडे, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, मंजुषा हिंगे, प्रतीक गांधी, पंतप्रधान आवास योजना लाभार्थी सतीश उगले,सोमेश्वर निसर्गंध उपस्थित होते. यानिमित्ताने उपस्थित नागरिकांना जास्तीत जास्त ‘झाडे लावा, झाडे जगवा‘ असा संदेश देण्यात आला..