महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.सुधीरजी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथे डॉ.निलपवार हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप हे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना झाडाची रोपे देण्यात आली.
यावेळी बोलताना शंकरभाऊ जगताप म्हणाले, “व्यक्तिगत जीवन जगत असताना समाजाचे आपण काहीतरी देण लागतो या शिकवणीतून आपण समाजाप्रती कार्य केले पाहिजे याच उद्देशाने भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी मोफत अटल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते यापुढील काळात रुग्णसेवेसाठी आपल्या मदतीने जोमाने सोबत मिळून कार्य करू”
यावेळी शंकरभाऊ जगताप यांनी समाजसेवेसाठी राबवलेल्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल डॉ.निलपवार आणि टीमचे आभार मानले. या कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती श्री.राजेंद्र राजापुरे तसेच पिंपळेगुरव परिसरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…