महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ सप्टेंबर : पिंपरी चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा चा दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी च्या सकल मराठा क्रांती मोर्चा च्या बंदला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करीता आंदोलन सुरू असताना अंतरवली सराटी जिल्हा जालना येथे आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर बंदचे आव्हान करण्यात आले आहे.या बंदला श्रद्धेय मा.खा.ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशन्वये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा प्रभारी प्रा. किसन चव्हाण सर यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहर बंदला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
पाठिंब्यांचे पत्र सकल मराठा समाज क्रांती मोर्चा चे समन्वयक सतीश काळे यांना देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव मा.संजय ठोंबे, उपाध्यक्ष प्रीतम कांबळे,माजी शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड,शहर सचिव प्रमोद मगर,शहर उपाध्यक्ष ईश्वर तायडे भोसरी विधानसभा उपाध्यक्ष महादेव कावळे,अनिल सरवदे,प्रविण डोंगरे,आदि उपस्थित होते.