Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सोमवारी जनसंवाद सभा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १ मे २०२२) : शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज (सोमवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला. याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये, अ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ब क्षेत्रिय कार्यालय – बांधकाम परवानगी सह शहर अभियंता मकरंद निकम, क क्षेत्रिय कार्यालय – भूमि आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रिय कार्यालय – नागरवस्ती उपआयुक्त अजय चारठणकर, इ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त

(३) उल्हास जगताप, ग क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ह क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.

संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित राहतात. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिका-यांशी चर्चा करून तक्रारींचे निराकरण करतात.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

13 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

18 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago