Google Ad
Editor Choice Sports

Tokyo Olympics 2021 : ‘ या ‘ खेळात 13 वर्षीय मुलींची कमाल … एकीने जिंकल सुवर्णपदक तर दुसरीच्या नावे रौप्यपदक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६जुलै) : टोक्यो ओलिम्पिकचा (Tokyo Olympics) आज चौथाच दिवस असून अनेक चुरशीचे सामने आणि खेळाडूंचा उत्कृष्ठ खेळ पाहायला मिळतो. चौथ्या दिवशी स्केटबोर्डिंगमध्ये तर अवघ्या 13 वर्षीय मुलींची कमाल दिसून आली. 13-13 वर्षाच्या दोघींनी एकाच स्केटबोर्डिंगच्या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं पटकावली. यावेळी जपानच्या निशिया मोमजी (nishiya momiji) हिने सुवर्णपदक तर ब्राझीलच्या रायसा लील (Raysa lil) हिने रौप्यपदक खिशात घातलं. विशेष म्हणजे या दोघीही अवघ्या 13 वर्षांच्या आहेत.
महिलांच्या स्केटबोर्डिंग स्पर्धेत कांस्य पदकही जपाननेच पटकावलं.

18 वर्षीय फुना नाकायामा हिने कांस्य पदक पटकावलं. या तिन्ही खेळाडूंच हे पहिलंच ऑलिम्पिक मेडल असून आपल्या आयुष्यातील पहिल्याच ऑलिम्पिक खेळांत या तिघींनी स्वत:ची हवा केली आहे.

Google Ad

स्केटबोर्डिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर जपानच्या निशिया हिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आयुष्यात पहिल्यांदाच तेही इतक्या कमी वयात ऑलिम्पिक पदक जिंकल्यामुळे असे होणे साहजिकच होते. निशियासह तिच्या देशासाठी ही एक अत्यंत मोठी आणि मानाची बाब आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!