भारताला प्रतिष्ठा आणि सन्मानासह जागतिक पातळीवर स्थान मिळवून देणाऱ्या रतन टाटा यांचा आज वाढदिवस … त्यांच्याविषयी कुतूहल असणाऱ्या चाहत्यांसाठी काही खास गोष्टी!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतातील यशस्वी आणि नीतिमूल्य जपणारे उद्योगपती रतन टाटा यांचा आज वाढदिवस, रतन टाटा आज ८३ वर्षांचे झाले असून अजूनही अखंडपणे कार्यरत आहेत. भारताला प्रतिष्ठ आणि सन्मानासह जागतिक पातळीवर स्थान मिळावे यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे.

नुकताच त्यांना ‘फेडरेशन ऑफ इंडो-इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स’ एफआयआयसीसी ने एकता, शांती आणि स्थिरतेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अॅन्ड पीस पुरस्कार देऊन सम्मनित केले आहे.

रतन टाटा यांचं पूर्ण नाव आहे रतन नवल टाटा. १९३७ साली गुजरातेतल्या सूरत इथं रतन टाटा यांचा जन्म झाला. सकारात्मक आणि व्यापक मानसिकतेमुळे ते आज या उंचीवर पोचले आहेत.

आज टाटा यांच्या ८३ व्या जन्मदिनी त्यांच्याविषयी कुतूहल असणाऱ्या चाहत्यांसाठी काही खास गोष्टी :-

रतन टाटा यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूल इथून १९७५ साली आपलं शिक्षण पूर्ण केलं. आजवर देशाच्या प्रगतीमध्ये दिलेल्या लक्षणीय योगदानासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्म विभूषण आणि पद्म भूषण अशा सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना उद्योग या विभागामधून ‘सीएनएन आयबीएन इंडियन ऑफ द इयर’ हासुद्धा किताब मिळाला आहे.
– रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा आणि आईचं नाव सुनी टाटा होतं.

– असं म्हणतात, की टाटा यांना पाळीव प्राणी खूप आवडतात. शिवाय विमान उडवणं हाही त्यांचा एक छंद आहे.
– जेआरडी टाटा यांच्यानंतर रतन टाटा हे टाटा उद्योगसमूहाचे पाचवे चेअरमन बनले.
– रतन टाटा यांनी सामान्य माणसाच्या आवाक्यातली कार म्हणून नॅनोची निर्मिती केली, तेव्हा त्यांचं नाव बातम्यांच्या मथळ्यांमध्ये सतत झळकत होतं.

– त्यांनी आपल्या करियरची सुरवात १९६२ साली टाटा उद्योगसमूहातून वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी केली.
– आधी मुंबई आणि मग शिमला इथल्या शाळेतून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.
– रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आणि टाटा ग्रुपचे संस्थापक जेआरडी टाटा यांचे दत्तक नातू आहेत.
रतन टाटा यांनी केवळ आपल्या कंपनीच्या महागड्या कार्सच विकल्या असं नाही, तर साधं मीठसुद्धा यशस्वीपणे विकत आपली विश्वासार्हता उंचावली. मीठ ही प्रत्येक सामान्य घरातली दैनंदिन गरज आहे. मीठ विकून टाटा शब्दश: घराघरात पोचले.

रतन टाटा यांना ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ कडून जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

11 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago