Google Ad
Editor Choice

जिल्हा रुग्णालय सांगवी परिसरामध्ये महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने प्लॉगेथॉन मोहिम

 महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ मे २०२२) : आज जिल्हा रुग्णालय सांगवी परिसरामध्ये महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने प्लॉगेथॉन मोहिम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी ६ टनापेक्षा अधिक कचरा संकलीत करण्यात आला.

शहराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शहर स्वच्छतेची चळवळ महापालिकेने सुरू केली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने “स्वच्छाग्रह” उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत असून विविध संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत. परिसरातील नागरिक त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवून आपले योगदान देत आहेत.

Google Ad

शहर स्वच्छतेचा हा उपक्रम निरंतर सुरू ठेवण्यासाठी महापालिकेने आज विविध ठिकाणी कचरा संकलनासाठी प्लाॅगेथाॅन मोहिमेचे आयोजन केले होते. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत झालेल्या प्लॉगेथॉन मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, धर्माधिकारी प्रतिष्ठान चे विविध पदाधिकारी आणि सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!