Google Ad
Uncategorized

पक्षांची तहान भागवण्यासाठी, नवी सांगावीतील ‘ओम साई ट्रस्ट’च्या वतीने स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : उन्हाळा आला की ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. माणसाची तहान भागावी यासाठी हा खटाटोप केला जातो. परंतु या रखरखत्या उन्हात मुक्या पक्ष्यांचे काय हाल होत असतील ? नेमक्या याच जाणिवेतून नवी सांगवी येथील ओम साई ट्रस्ट आणि नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्या संकल्पनेतुन पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी मोफत मातीची भांडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे पक्षीप्रेमी तसेच सर्व नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. माणसाला जशी पाण्याची नितांत गरज आहे, तशी येथील प्राणी-पक्ष्यांनाही त्याची गरज आहे. माणसाला पाणी सहज उपलब्ध होते. परंतु पक्षांना त्यासाठी वनवन भटकावे लागते. पाण्यासाठी पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. शहरी भागात चिमण्या तसेच अन्य पक्षी पाण्याच्या शोधात नागरिकांच्या घराजवळ येत असतात. याचा विचार करत नवनाथ जगताप मित्र परिवारातर्फे पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याकरिता नागरिकांच्या मागणीनुसार मातीची भांडी घर पोहोच करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

Google Ad

उन्हाळ्यात अंगाची होणारी लाहीलाही आणि त्यात पाण्याची टंचाई बघून जीव अगदी कासावीस होतो. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पंखा, एसी, कुलर आदींचा आपण आधार घेतो. किंबहुना आपण या सोयीसुविधांमुळे आरामदायी जीवन जगत असतो. पण मुकी जनावरे, पक्षी यांचे उन्हाळ्यात पाण्याअभावी खूप हाल होत असतात अनेक पक्षी पाण्याच्या शोधात भटकतात. बऱ्याचदा हे पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडेही येतात. उष्णतेमुळे कासावीस झालेल्या या पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे. घराची बाल्कनी, टेरेस येथे पाणी ठेवण्यासाठी मातीची भांडी नागरिकांना उपलब्ध करून मिळतील. असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!