Google Ad
Editor Choice

वाकड येथिल नविन वादग्रस्त सार्वजनिक उद्यानास अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे नाव देण्याची .… रयत विद्यार्थी परिषदेची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ जून) : रयत विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष सुर्यकांत अर्जून सरवदे यांनी राजेश पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे सर्वे नं 128/5 वाकड येथिल नविन सार्वजनिक उद्यानास अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे नाव देणेबाबातची मागणी केली आहे.

या मागणी त त्यांनी म्हटले आहे की, आम्ही रयत विद्यार्थी परिषद आपणाकडे विनंती अर्ज करीत आहोत की प्रभाग क्र 25 वाकड येथील नवीन सार्वजनिक उद्यानाचे काम पुर्णत्वास येत आहे . त्याअगोदरच या उद्यानास स्थानिक नगरसेवकांनी उद्यानास कै तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यान असे नामकरण केले आहे आणि त्यास महासभेने आणि आयुक्तांनी मुक संमती दिली आहे.संदर्भानुसार आपण महापुरुषांची नावे उद्यानास, सार्वजनिक इमारतीस देण्यास कार्यपद्धती ठरवून घेतली आहे.परंतु परिवार वाद जोपासण्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडून कुटुंबातील व्यक्तींची नावे सार्वजनिक उदयानास नाव देण्यासंदर्भात अट्टाहास का केला जात आहे.

Google Ad

त्या एवजी थोर समाजसुधारक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत ऊर्जा अवस्थेत ठेवणारे आहे.जागतिक दर्जाचे शहर बनत असताना शहरांमध्ये सिंधुताईंच्या नावे असणारे उद्यान येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरेल तरी आमची अशी मागणी आहे की सदर उद्यानाचे नाव बदलून अनाथांची माय सिंधुताई यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी सुर्यकांत अर्जून सरवदे अध्यक्ष – रयत विद्यार्थी परिषद यांनी केली आहे.

नामकरणाच्या विरोधात केला होता निषेध:-

कालच (दि.०३)उद्यानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन सुरु असताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ह्या नामकरणाच्या विरोधात निषेध करीत अजित पवारांना याबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करीत ताब्यात घेतले त्यामुळे आंदोलकांची पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. या प्रकारामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उदघाटन उरकल्याने पोलिसांनी आंदोलकांना सोडताच चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे यांनी उद्यानाच्या प्रवेश द्वाराजवळ मुंडन करत महापालिका प्रशासनाचा व नामकरणाचा निषेध केला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!