चिंचवड विधानसभा मतदार संघातील शालेय व्हॅनचालक व रिक्षा चालकांना गणवेश(ड्रेस) स्वतःच्या मानधनातून देणार – आमदार लक्ष्मण जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५जून) : डोनेट एड सोसायटी व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर,सौ सारिका भंडलकर यांच्या प्रेरणेने व सहकार्याने आज आज दिनांक 15 जून 2021 रोजी पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात रिक्षा चालक व शालेय व्हॅनचालक यांना  धान्यकिट वाटप कार्यक्रमात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी लॉक डाऊनच्या काळात अनेक रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालक यांचे रोजगार बुडाले असल्याकारणाने सामाजिक जाणीव आणि कर्तव्याच्या भावनेतून एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत धान्य वाटप करताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालकांना स्वतःच्या विधिमंडळाच्या मानधनातून एक गणवेश ड्रेस शिवून देण्याचे जाहीर केले.

मागील संपूर्ण वर्ष शाळा व शैक्षणिक संस्था बंद असल्याकारणाने शालेय व्हॅनचालक बांधवांचा रोजगार बुडाला आहे तसेच लॉकडाउन एक व दोनच्या काळात अनेक रिक्षाचालक यांना व्यवसाय बंद असल्या कारणाने उपासमारीला सामोरे जावे लागले आहे, एकीकडे शासन पंधराशे रुपये आर्थिक मदत करीत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सदर आर्थिक दुर्बल घटकातील रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालकाना  तीन हजार रुपये देण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत ठराव करूनही मनपा आयुक्त हे राजकीय भूमिकेतून सदर  आर्थिक दुर्बल घटकांना अनुदान देण्याच्या ठरावाचे अंमलबजावणी करीत नसल्याचे सांगितले.

आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार जगताप यांनी याप्रसंगी दिली. ज्या शालेय व्हॅन चालक व रिक्षाचालक बंधूं वर उपासमारीची वेळ आली आहे त्या सर्वांना वात्सल्यचा घास योजनेअंतर्गत सृष्टी चौकात प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने सुरू असलेल्या सेंटर किचन मधून जेवण देण्याचे घोषित केले.  तसेच पूरक व्यवसायकरिता पतसंस्था व सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे ग्वाही दिली.

सदर प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे व संस्थेचे बाबु गंगावणे, मयूर शेलार, संतोष जावणे, पंकज मानेकर ,मंदार कुलकर्णी ,विकास ढोरे, प्रकाश शिंदे, सागर नांगरे ,बाळासाहेब रोकडे, नागेश घारे,हेमा गंगावणे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व सुमारे दीडशे रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा भंडलकर यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. सारिका भंडलकर यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago