Categories: Editor Choice

पिंपळे गुरव मधील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी … तानाजी जवळकर यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७सप्टेंबर) :: पिंपळे गुरव येथील तानाजी जवळकर सोशेल फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज (दि.१७) रोजी घेण्यात आला.

कोरोनाच्या संकट काळात महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे, त्यांना या नैराश्यातुन बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व तानाजी जवळकर व तृप्तीताई जवळकर परिसरात नेहमीच अग्रभागी असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी परिसरातील महिला भगिनींकरिता ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आज पिंपळे गुरव येथे पार पडला.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघिरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, वैशाली काळभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी बोलताना ‘संजोग वाघिरे’ म्हणाले, तानाजी जवळकर हे नेहमीच आपल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी करीता धावून जातात, कोरोनाच्या संकट काळात त्यांनी औषधे वाटप , मोफत रुग्णवाहिका सेवा नागरिकांकरीता उपलब्ध करून दिली त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

यावेळी शाम जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, पै. गणेश जगताप, शोभाताई आदियाल, सामाजिक कार्यकर्ते अंकुशआप्पा जवळकर,मुकेश पवार, मधुकर रणपिसे, बाळासाहेब काशीद, जितेंद्र जवळकर, अतुल काशीद आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय कदम यांनी केले,तर अमर आदियाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

9 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago