Categories: Editor Choice

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्रात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक प्रमुख पदी … श्री शंकर पांडुरंग जगताप यांची नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ फेब्रुवारी) : महापालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.२५) निश्चीत करण्यात आली. त्यानुसार पक्षाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्रात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख पदी श्री शंकर पांडुरंग जगताप व सहाय्यक पदी श्री संतोष गुलाब कलाटे यांची नियुक्ती केली आहे.

पालिकेच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आज (दि.२६) त्यांचा सत्कार कृष्णा चौक येथील भाजप कार्यसल्यात सांगवी काळेवाडी मंडल च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब जाधव, सुनील कोकाटे, नागेश जाधव, सखाराम रेडेकर,राजू नागणे, गणेश बनकर, संदीप दरेकर, माऊली जगताप, शिरीष कवडे, संतोष पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप जगताप, साईश कोकाटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, भारतीय जनता पक्षाने नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहुन त्यांच्या कामास प्रथम प्राधान्य दिले आहे, आणि यापुढील काळात ही ते देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपच (BJP) सत्तेत येणार असून शंभर प्लस नगरसेवक निवडून येतील, शहराचा एकूण आढावा घेता, आमचे शंभर प्लस नगरसेवक निवडून येणार, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

10 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

17 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago