Google Ad
Editor Choice

‘टायगर’ इज बॅक … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या प्रकृतीत सुधारणा लवकरचं येणार जनसेवेसाठी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : एका दुर्धर आजारावर उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आठवड्याच्या आत त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला जावू शकतो. नुकतेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी हॉस्पिटलच्या बाल्कनीत उभे राहून उपस्थित कार्यकर्त्यांना व समर्थकांना हातवारे करत मी ठणठणीत असल्याबद्दल सांगितले. यावेळी जगताप यांची प्रसन्न मुद्रा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही दिवसांपासून बाणेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारासाठी दाखल करत असताना त्यांची प्रकृती नाजूक अवस्थेत होती. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु होत्या. आमदार जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मंदिरात मंत्र, अभिषेक, महाआरत्या करण्यात आल्या. शेवटी डॉक्टरांची दवा आणि जनतेची दुवा अखेर सार्थक ठरली सध्या आमदार जगताप यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे. त्यांनी स्वतः हॉस्पिटलच्या बाल्कनीत येवून सर्वाना अभिवादन केले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!