Google Ad
Uncategorized

‘धनश्री पाटील’ सांगतायेत आपला एक थरारक अनुभव : मालदीव हून एक अवघड व आव्हानात्मक dead body repatriation, … कसे आणले भारतात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑक्टोबर) : २२ ऑक्टोबर संध्याकाळी मालदीव ची एक बातमी आली तेथील एका आइसलँड वर गॅस च्या भीषण स्पोटामध्ये २ भारतीय तरुण मोहम्मद अन्सारी वय २७ बिहार आणि सुधीरा सेठी वय २५  ओडिसा या दोघांचा मृत्यू झाला, नेहमी प्रमाणे इंडियन एंबेसी authority , मालदीव येथील रेडिओ advisor कर्नल विनो, आणि त्यांचे सहकारी विष्णू जी यांनी शव भारतात कुटुंबियां पर्यंत पोहचविण्याच्या तयारीस लागले. शव भारतात आल्यावर घरा पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मला पहायची होती.

इकडे माझी शव भारतात आल्या नंतर पुढे घरापर्यंत पोहचविण्याची तयारी सुरू झाली. भारतातली आमच्या टीम बरोबर पुढील नियोजन मी करायला सुरुवात केली. आणि न्यूज पेपर मधील बातमी वाचली. स्पोट इतका भीषण होता की मृतांचे अवयवांचे अवशेष ५०० फुटा वर आढळले होते, बातमी वाचूनच हे repatriation ऑपरेशन किती अवघड आहे ह्याचा अंदाज आला.

Google Ad

मालदीव मध्ये embalming नसल्याने शव खराब न होता चांगल्या परिस्थितीत कुटुंबीयां पर्यंत ते पोहचविणे  ही आमच्या साठी मोठी जबाबदारी असते आणि ह्या वेळी तर ते जास्त आव्हानात्मक होते.

मालदीवच्या आमच्या टीम कडून अंदाज आला होता शरीराचे तुकडे झाले आहेत. परंतु कोणत्या मार्गाने म्हणजे विमानाने किंवा रोड ने शव बिहार आणि ओडिसा पर्यंत पोहचावावे हे ठरविण्यासाठी मला बॉडी पाहणे आवश्यक होते. उद्या शवागारात गेल्या नंतरच नक्की काय ते कळू शकेल आणि फोटो देखील अधिकाऱ्यांची परवानगी असेल तर काढता येतील माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितले, दुसऱ्या दिवशी ची वाट पाहण्या शिवाय पर्याय नव्हता.

दुसऱ्या दिवशी दसरा होता, सर्वांकडे सणाची तयारी चालू होती. सकाळी सकाळी आमच्या मालदीवच्या सहकाऱ्यांचा फोन आला त्यांनी केलेले दोन्ही शवांचे वर्णन भयंकर होते. दोन्ही शावांचे डोके नव्हते, भीषण स्पोटा मुळे शरीराचे तुकडे आणि शरीर भयंकर जळालेले होते. शवांची अवस्था अशी होती की ते शवागारात आणल्या नंतर आजूबाजूचे लोकांनी तेथून काढता पाय घेतला. तेव्हाच दुर्गंधी यायला लागली होती. मॅडम फोटो पाठविला आहे तो पहा आणि कसे घरापर्यंत पाठवता येईल ठरवा असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. मन घट्ट करून दोन्ही फोटो पाहिले . सर्वसामान्य व्यक्ती पाहूच शकणार नाही असे ते फोटो होते. आता मात्र मनाची तयारी केली की पुढील २ दिवस खूप मोठे दिव्य पार करून हे काम आपल्याला पूर्ण करावेच लागणार आहे. मागे हटून चालणार नाही. एकतर इतक्या लहान वयात गेलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीया पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. दुसरी कडे दोन्ही कुटुंबीयांचे बॉडी घरी कधी येईल या साठी फोन वर फोन यायला लागले. कुटुंबीयांना नियमांची माहिती नसल्याने सहजच १ दिवसात बॉडी मिळावी ही अपेक्षा असते. पण ह्या सर्व कामात पूर्ण २ दिवस तरी जातातच . ते त्यांना आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते त्या मनःस्थितीत समजून घ्यायला तयार नसतात.मालदीवच्या सहकाऱ्यांनी बॉडी पॅक झाल्या नंतर स्पष्ट सांगितले की दोन्ही बॉडी ची परिस्थिती इतकी खराब आहे की जवळच्या कुटुंबीयांनी देखील ती पाहू नये. आता माझ्या पुढे नवीन आव्हान ह्या दोन्ही कुटुंबीयांना शवाची खरी परिस्थिती सांगणे आणि अगदी पहिलेच तर त्यांनी कोणती वेगळी प्रतिक्रिया येऊ नये म्हणून मानसिक तयारी करणे, कसेबसे बोलून ते मी केले.

आता पुढचे आव्हान आमची टीम जी मला या कामात बॉडी एअरपोर्ट वरून ताब्यात घेणे , embalming आणि बाकी सगळ्या सगळ्या कागदोपत्री औपचारिकता करून बॉडी घरा पर्यंत पोहचवला मदत करतात त्यांना शवाच्या परिस्थितीतही कल्पना देणे. ते जर पाहून एक जण जरी मागे हटला तर शव भारतात तर येईल पण कुटुंबीयां पर्यंत पोहचणार नाही. शव एअरपोर्ट वर आल्यावर रात्री ११ वाजता  embalming करणाऱ्या दादांनी फोन झाला. दादा जपून उघडा परिस्थिती खूप भयानक आहे असे त्यांना सांगताच त्यांनी सांगितले ताई काळजी करू नका मी करतो सगळे बरोबर आपण घेतली आहे जबाबदारी आपण करू सगळे पार नीट. रात्र भर मला काळजी काय झाले असेल त्यांनी कॅफेन उघडल्यावर कशी असेल बॉडी ची परिस्थिती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फोन केला त्या दादांना त्यांचा आवाज पूर्ण बसलेला होता. बॉडी अजून जास्त खराब होणे थांबवावे या साठी जे काही केमिकल वापरता त्या मुळे तसेच ती हाताळून  त्यांचा आवाज पूर्ण बसला होता. त्या दिवशी संध्याकाळचे बिहार फ्लाईट चे बुकिंग मिळाले . परंतु ओडिसा फ्लाईट चे बुकिंग काहीं मिळाले नाही. ओडिसा वाले कुटुंबीयांनी बॉडी कधी पाठवताय म्हणत फोन वर फोन करायला सुरुवात केली. अशा वेळी एकाच फोन वर अनेक नातेवाईक बोलत असतात.  अनेकांना आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्ती बरोबर आपण बोलत आहोत याचा विसर पडतो आणि खूप उद्धट ते बोलत असतात. लोकल राजकीय नेत्यांचे फोन यायला लागतात. एकच गोष्ट अनेक लोकांना समजावून सांगावी लागत असते. एक वेगळाच मानसिक ताण ह्या वेळी मला जाणवत होता. त्यातच मी ८ दिवसां पूर्वी पासून आजारी , अशक्त पणा, आणि त्यात ही जबाबदारी आणि मानसिक ताण. रात्री झोप पण लागेना. सकाळ झाली की फोन चालू. शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे ओडिसा चे बुकिंग मिळाले.  रात्री ९ वाजता कुटुंबीयांचा फोन आला “मॅडम ambulance ड्रायव्हर सांगत आहे बॉडी चा खूप वास येत आहे घरा पर्यंत नाही आणू शकत”... झाले आता हे अजून एक आव्हान.  Ambulance ड्रायव्हर बरोबर बोलल्यावर कळले की त्याने बॉडी विमानतळावरून ताब्यात घेऊन तो निघाला खरा पण वास इतका असह्य होता की पहिल्या २-३ किलो मिटर मध्ये त्याला ३ वेळा उलट्या झाल्या. त्या अजून १२० किलोमिटर अंतर पार करायचे होते जे त्यांना शक्य नव्हते.  दुसरी कडून कुटुंबीयांचे फोन काही करा पण घरी बॉडी पोहचवा. त्यांना विश्वास दिला काळजी करू नका काही करून बॉडी घरा पर्यंत येईल थोडा वेळ लागेल कृपया सहकार्य करा.

Tansportation करिता मदत करणाऱ्या टीम चे खरच मानावे तितके आभार त्यांनी मला एकच विश्वास दिला तुम्ही आमच्या ताई आहात तुमचा शब्द खाली नाही पडू देणार दुसरी ओपन ambulance करू ड्रायव्हर बदलू पण शव घरा पर्यंत तुमच्या साठी आम्ही पोहचवू .घेतलेली जबाबदारी पूर्ण नक्कीच करू. काळजी करू नका. त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला रात्री १२.३० ला त्या गावच्या सरपंच यांचा बॉडी पोहचल्याचा मेसेज आला. मी निर्धास्त झाले. आयुष्यातील आव्हानात्मक शव कुटुंबानं पर्यंत पोहचविण्याचे कार्य पूर्ण झाले. अजून देखील ते काम चालू असलेले दिवस आठवले तर अंगावर शहारे येतात. ह्या दोन्ही कुटुंबियांवर आलेली वेळ खरच कोणा वर येऊ नये.

डॉ ज्ञानेश्वर मुळे सर यांनी REDIO (rescuing every distressed Indian Overseas) या संस्थेची जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ती फक्त जबाबदारी नाही हा आपल्या विदेशात अडचणीत असलेल्या आपल्या भारतीयांना मदत करण्याचा घेतलेला एक वसा आहे जो काही करून कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचा प्रयत्न माझा आहे. ह्या कार्यात मला भारतीय दूतावास मालदीव, मालदीव चे समाजसेवक कर्नल वीनो सर, विष्णू जी, भारतात शव आल्या नंतर घरा पर्यंत पोहचविताना सहभागी असलेली प्रत्येक व्यक्ती यांचे मनपूर्वक आभार

धनश्री पाटील
CEO REDIO
+91 9503107419

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!