महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे फळविक्री व्यावसायिकास खंडणी मागणाऱ्या तिघांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन आरोपींना खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
छोटे मोठे व्यावसायीक, कंपनी तसेच नागरीकांकडून कोणत्याही प्रकारे जबदस्ती करुन त्यांच्याकडून हप्त वसुली, खंडणी गोळा करणाऱ्या व्यक्तींची माहिती निर्भिडपणे देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकामार्फत दर्शनीय भागावर फ्लेक्स लावुन, नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने फळविक्री व्यावसायीकाने खंडणी विरोधी पथक कार्यालयात समक्ष हजर राहून माहिती दिली.
सुमारे १ वर्षापासुन साने चौकाजवळील भाजी मंडई, चिखली येथे फळविक्री व्यावसायिक फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. दरम्यान बाळा गारुळे हा त्याचे साथीदार मयुर, संदीप, भरत व त्यांचे इतर ०३ अनोळखी साथीदार हे व्यावसायिकास दमदाटी करून दररोज ५० रूपये प्रमाणे जबरदस्तीने हप्ता म्हणून खंडणी घेत होते. हप्ता न दिल्याने जीवे मारण्याची धमकी देवून गल्ल्यातून जबरदस्तीने हप्ता म्हणून २०० रुपये काढुन घेतले. आतापर्यंत आरोपींनी फळविक्री व्यावसायिकाकडुन २१,००० रुपये रक्कम जबरदस्तीने हप्ता म्हणुन खंडणी घेतली आहे. अशी तक्रार फळविक्री व्यावसायिकाने दिली होती. त्याबाबत वपोनि अरविंद पवार यांनी तात्काळ दखल घेवुन, सदर प्रकार वरिष्ठांना कळविला. वरिष्ठांनी याबाबत दिलेल्या आदेश व सुचना प्रमाणे व्यावसायीकाने दिलेली तक्रार घेवुन त्याबाबत चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर १६७/२०२३ भादवि कलम ३८६,३९२, २९४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करीत त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे ते स्टाफसह पाहिजे आरोपींचा निगडी व चिखली परिसरात शोध घेत घेतला. पोहवा ८५६ रमेश मावसकर व पोहवा ८८१ गोडांबे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून आरोपी बाळु उर्फ जयंत नारायण गारुळे (वय ४६ वर्षे रा. राजे शिवाजीनगर से नं. १६. चिखली), संदीप बाबुराव बाबर (वय २८ वर्षे रा. मोरेवस्ती चिखली), भारत नवनाथ सोनावणे (वय २२ वर्षे रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती चिखली) यांना (दि. १४) रोजी रात्री १०:३० वाजता भाजी मंडई, साने चौक, चिखली येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केला असल्याची तोंडी कबुली दिली.
आरोपीतांनी चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १६७/२०२३ भादवि कलम ३८६.३९२.२९४. ३२३.३४ हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करत आहे. आरोपी बाळु उर्फ जयंत नारायण गारुळे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द खून, खुनासह दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे, चोरी असे एकुण ०९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन, त्याचेवर सन २००० मध्ये मोका कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…