Mumbai : मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद … मंत्रालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

महाराष्ट्र 14 न्यूज : पावसाळी अधिवेशनंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम पॉझिटिव्ह आले. अधिवेशन सुरू होण्याआधी त्याआधी अध्यक्ष नाना पटोले देखील कोरोनाबाधित झाले होते. अधिवेशनाच्या वेळी देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर,प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले तर उदय सामंत यांच्याही कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आले.

 

तर ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयातील १० अधिकारी ,कर्मचारी घरत काम करणारा कुक पॉझिटिव्ह आले. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने छगन भुजबळ यांनी घरात क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. नितीन राऊत मात्र बैठकांना हजेरी लावत आहेत, अस असलं तरी मंत्र्यांच्या स्टाफला कोरोना बाधा झाल्यामुळे त्यांचे कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आलेलं आहे. सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंत्रालयातील मंत्री कार्यालयात ही राज्यातून लोक कामासाठी येतात त्यामुळे खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे. मंत्रालयात याआधी देखील ज्येष्ठ अधिकारी कोरोना बाधित आढळले होते त्यानंतर मंत्रालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विनियोजन आणि विधेयक हेच काम प्रामुख्याने झाले. कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. मंत्र्यांनाही प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी नसल्यामुळे अधिवेशनात विशेष आपल्या खात्यात काय सुरू आहे हे मांडण्याची संधी मिळाली नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago