Google Ad
Editor Choice

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून … पिंपळे गुरव येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ डिसेंबर) : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या कीर्तन महोत्सवाचे मुख्य संयोजक विजय (आण्णा) जगताप यांनी दिली.

कीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न केला. ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’ म्हणजे भक्तजन आणि प्रेक्षक यांच्यासाठी भक्तिमय कीर्तनाची पर्वणीच. हा नाविन्यपूर्ण कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम भक्तांच्या करीता घेऊन येत दिवसाची सुरुवात आध्यात्मिक व मंगलमय होणार आहे.

Google Ad

हा कीर्तन सोहळा २४ ते २६ डिसेंबर असे तीन दिवस पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे.

२४ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १२.०० ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर, जळगाव) आणि दुपारी ३.०० ते ५.०० ह. भ.प. गजानन महाराज वावळ (सांगवी ,पुणे), तसेच सायंकाळी ७.०० ते ९.०० ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.

२५ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १२.०० युवा कीर्तनकार ह.भ.प. राहुल महाराज पारटे (भोर, पुणे), दुपारी ३.०० ते ५.०० महामंडलेश्वर महंत आचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर (लहवित, नाशिक), सायंकाळी ७.०० ते ९.०० ह.भ.प. अविनाश महाराज भारती (घाटनांदूर, बीड) आदींचे कीर्तन होईल.

२६ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १२.०० ह.भ.प. केशव महाराज उखळीकर (परळी – वैजनाथ, बीड), सायंकाळी ७.०० ते ९.०० ह.भ.प. समाजप्रबोधनकार विनोद महाराज रोकडे- कोळगावकर (करमाळा, सोलापूर) आदींचे कीर्तन होईल. या तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याला ह.भ.प. महंत पुरुषोत्तमदादा पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

या कीर्तन सोहळ्याचे मनमंदिरा या लोकप्रिय कीर्तन मालिकेत प्रेक्षपण होणार आहे. कीर्तन सोहळ्याचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी सभापती राजू लोखंडे, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड व ह.भ.प. अर्जुन शिंदे यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!