Google Ad
Editor Choice

यावर्षीचे गणेशविसर्जन घाटांवर करता येणार नाही … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की , या वर्षी कोरोना विषाणू ( कोव्हीड -१९ ) या साथीच्या आजारामुळे ” ह ” क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र . – ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव, तसेच प्रभाग क्रं.- ३२ जुनी सांगवी या परिसरातील सर्व घाटावरील सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन बंद करण्यात आलेले आहेत .

Google Ad

त्यामुळे सर्व नागरिकांनी शक्यतो गणेश विसर्जन आपल्या घरीच करावयाचे आहे . ज्या नागरिकांना गणेश मुर्ती घरी विसर्जन करणे शक्य नसेल त्यांनी गणेश मुर्तीची पुजा घरीच करून आपल्या नजिक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गणेश मुर्ती संकलन केंद्रावर गणेशमुर्ती आणून द्यावी .

▶️असे असेल प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव,

गणेश मुर्ती संकलन केंद्र

♾️१ ) पी . डब्ल्यु . डी . येथील बँडमिंटन हॉल सांगवी .
♾️२ ) काळूराम जगताप बँडमिंटन हॉल पिंपळे गुरव
♾️३ ) निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव
♾️४ ) म.न.पा. शाळा पिंपळे गुरव .

▶️ प्रभाग क्रमांक ३२ जुनी सांगवी, गणेश मुर्ती संकलन केंद्र :-

♾️1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा गजानन महाराज मंदिरासमोर , जुनी सांगवी .
♾️2) कै.बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव आवारात , आनंदनगर , जुनी सांगवी
♾️ ३ ) मल्हार गार्डन हॉल , सुआशि रेस्टॉरंट समोर , नवी सांगवी
♾️4 ) बालाजी लॉन्स , मुळा रोड , जुनी सांगवी .

 

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या प्रतिबंधानुसार साधेपणाने गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन पार पाडून महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!