Categories: Editor Choice

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ३० सप्टेंबर रोजी कोविड-१९ लसीकरण … पहा-कुठे मिळणार कोणाला कोणत्या ‘ लसीचा डोस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ सप्टेंबर २०२१) : उद्या दि.३०/०९/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस पहिल्या डोसनंतर ( १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील सर्व कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.११/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

▶️तसेच उद्या दि.३०/०९/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

♾️सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.
कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.३०/०९/२०२१ सकाळी ८.०० वाजण्यापुर्वी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

♾️पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

♾️ज्या नागरिकांची ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

▶️तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.३०/०९/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

▶️अ.क्र व लसीकरण केंद्राचे नाव :-

१) नवीन भोसरी रुग्णालय

२) कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी

३) उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर

४) आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ

५) अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा

६) खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव

७) जुने जिजामाता रुग्णालय

८) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

10 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

17 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago