Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे २५ जुलै चे कोविड-१९ लसीकरण … पहा कोणाला-कुठे मिळणार कोणत्या’ लसीचा डोस*

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२४ जुलै २०२१) : उद्या दि .२५ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २६० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल . तसेच प्रायोगिक तत्वावर पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ४० लाभार्थ्यांचे सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत लसीकरण करण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .२५ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर – ज्यांनी कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेले आहे अशांना सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .२५ / ०७ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रांवर सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणी व्दारे सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत लसीकरण करण्यात येईल .

तसेच उद्या दि .२५ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थांना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

* कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .२५ / ०७ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थीना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल . तसेच गरोदर महिलांचे कोविड -१९ लसीकरण करणेकामी उद्या दि .२५ / ०७ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!