Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे १४ जुलै चे कोविड-१९ लसीकरण! … पहा कोणाला-कुठे मिळणार कोणत्या’ लसीचा डोस*

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१३ जुलै २०२१) : उद्या दि .१४ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .१४ / ०७ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .१४ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

* वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल . तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .१४ / ०७ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील . * वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल . त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .१४ / ०७ / २०२१ रोजी सकाळी ० ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये . * पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थीना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल . तसेच गरोदर महिलांचे कोविड -१ ९ लसीकरण करणेकामी उद्या दि .१४ / ०७ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!