Google Ad
Editor Choice

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे २७ जुलै चे कोविड-१९ लसीकरण! … पहा कोणाला-कुठे मिळणार कोणत्या ‘ लसीचा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२६ जुलै २०२१) : उद्या दि .२७ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . सदर लाभार्थ्यांचे लसीकरण हे खालील तक्त्यामधील स्तंभ क्र .४ व ५ मध्ये नमूद पध्दतीने करण्यात येईल .

Google Ad

तसेच ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर एकुण २०० लाभार्थी क्षमतेने कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल

तसेच उद्या दि .२७ / ०७ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . सदरचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर एकुण २०० लाभार्थी ( पहिला डोस ५० व दुसरा डोस १५० ) क्षमतेने ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणी व्दारे करण्यात येईल .

तसेच उद्या दि .२७ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड १ ९ लसीकरण केंद्रावर एकुण २०० लाभार्थी क्षमतेने देण्यात येईल . त्यापैकी १८० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणी व्दारे करण्यात येईल . तसेच प्रायोगिक तत्वावर पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या २० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

* सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल .

* कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .२७ / ०७ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल . तसेच गरोदर महिलांचे कोविड -१ ९ लसीकरण करणेकामी उद्या दि .२७ / ०७ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल .

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!