Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे १० जुलै चे कोविड-१९ लसीकरण! … पहा कोणाला-कुठे मिळणार कोणत्या ‘ लसीचा डोस*

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .० ९ जुलै २०२१) : उद्या दि .१० / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .१० / ०७ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .१० / ०७ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल . तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१०-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील . * वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल .
तसेच गरोदर महिलांचे कोविड -१ ९ लसीकरण करणेकामी उद्या दि .१० / ०७ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर ५० लाभार्थीचे डोस राखीव ठेवण्यात येत असून लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल

तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा , व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले 1-20 feat DS – 160 From ( Admission confirmation letter and I – 20 or DS – 160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc. ) , मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा – या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार दि . १०/०७/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी -१०.०० ते सायं- ०५.०० या वेळेत करण्यात येणार आहे .

लसीकरण केंद्राचे नाव
नविन जिजामाता रुग्णालय वय वर्षे १८ व १ ला डोस -१०० त्यापुढील २ रा डोस – १००

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .१० / ०७ / २०२१ रोजी सकाळी ० ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!