Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे रविवार ०४ जुलै चे कोविड-१९ लसीकरण …पहा कुठे मिळणार, कोणती लस

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .०३ जुलै २०२१) : उद्या दि .०४ / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

१८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल . तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०४-०७ २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

Google Ad

तसेच उद्या दि .०४ / ०७ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

वय ४५ वर्षा वरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर दि .०४ / ०७ / २०२१ रोजी सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये . तसेच उद्या दि . ०४/०७/२०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय वर्षे ४५ पुढील लाभार्थांना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!