महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २२ फेब्रुवारी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) वाकडमध्ये चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो केला. उघड्या गाडीतून लोकांना अभिवादन करत निघाले तेव्हा नागरिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. विशेषतः तरुणाईची तुफान गर्दी उसळली होती. “कमळ फुलू दे”च्या घोषणाबाजीने तरूणाईने एकच गलका केला होता. या रोड शोमुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. रोड शो दरम्यान सर्व रस्ते तुडूंब भरले होते. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे शक्तीप्रदर्शन पोटनिवडणुकीत लक्षवेधी ठरले.
मुख्यमंत्री वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची बरसात करत त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोला सुरूवात केली. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेल पासून पुढे विमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले. त्यांची छबी मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना लोक दिसत होते.
मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षाचे अनेक नेते सामील झाले होते. भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रोड शोच्या मार्गावर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले, मुख्यमंत्र्यांच्या रोड शोनिमित्त महायुतीच्या वतीने संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आले होते. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी उसळली होती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. रस्त्याने ठिकठिकाणी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता. रोड शोमध्ये कमळ फुलू दे आणि भाजपच्या विजयाच्या, महायुतीच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.रोड शोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. मुख्यमंत्रीही कधी हात उंचावून, तर कधी हात जोडून मतदारांना अभिवादन करताना दिसत होते.
*महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:* *विकसित भारत-विकसित महाराष्ट्र.* महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१० मार्च : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च : जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ मार्च - राज्यातील दारिद्र्यरेषेखालील महिला आणि ९ ते १४ वयोगटातील…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…