Google Ad
Editor Choice

भाजपचा हा विजय आमचे लढवय्ये ‘आमदार लक्ष्मण भाऊ जगताप’ यांना समर्पित करतो … देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ जून) : निवडणूक म्हटलं की हार-जीत आली. राज्यसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळपासून जो माहौल तयार झाला होता, तर चक्क शुक्रवारी पहाटेपर्यंत तसाच होता.

राज्यसभेची निवडणूक झाली. निकाल लागला. रात्रभर मतमोजणी सुरु होती. या मतमोजणीनंतर अखेर राज्यसभेच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. पहाटे लागलेल्या या निकालानंतर सगळ्यांनी भाजपच्या आमदारांनी एकच जल्लोष केला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार आनंद साजरा करत होते. यावेळी महाविकास आघाडीला डिवचणारी घोषणाबाजीही करण्यात आली. तसंच यावेळी पुन्हा एकदा म्यॅव म्यॅवचे आवाजही काढण्यात आलेत. शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी एकत्र येत विधान भवनाच्या पायऱ्यांवरुन विोधकांना डिवचलंय.

Google Ad

 

यावेळी अनिल बोंडे, धनंजय महाडिक आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे भाजपच्या विजयनानं भारावले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली. विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकात पाटील आणि आशिष शेलार यांनी मिठी मारली. त्यानंतर आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली. मग प्रवीण दरेकर यांनी आशिष शेलार यांना मिठी मारली आणि भाजपला मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. यादरम्यान, भाजपचे नेते भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. मात्र या सगळ्यात भाजपच्या घोषणा कुठेच थांबल्या नव्हत्या. यानंतर भाजपच्या नेत्यांनी एकमेकांनी पुश्चगुच्छ दिले आणि विजय साजरा केली. दिमाखात फोटोसेशनही यानंतर करण्यात आलं.

▶️विजयानंतर लक्ष्मण भाऊंबद्दल, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दरम्यान, या विजयानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘आमच्या सगळ्यांकरिता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भाजपचे तीनही उमेदवार याठिकाणी निवडून आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो.”लक्ष्मणभाऊ अॅम्ब्युलन्समध्ये बसून एवढ्या लांब प्रवास करुन इकडे आले. मी काल त्यांना फोन करुन त्यांच्या बंधूंना सांगितलं की, आम्हाला लक्ष्मणभाऊ जास्त महत्त्वाचे आहेत सीट आली काय किंवा गेली काय भविष्यात परत जिंकू. पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्त्वाचा आहे. पण लक्ष्मण भाऊंनी सांगितलं की, काय वाट्टेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणार आहे. त्यामुळे मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांचे आभार मानले.

राज्यसभेचा महाराष्ट्राचा अंतिम निकाल

भाजप – 3
शिवसेना – 1
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी काँग्रेस – 1
राज्यसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार जिंकला?

प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
संजय राऊत, शिवसेना – 41
पियुष गोयल, भाजप – 48
अनिल बोंडे, भाजप – 48
धनंजय महाडिक, भाजप – 41
राज्यसभेत मिळवलेल्या विजयानंतर आता भाजपचा विधानसपरिषदेसाठीचा आत्महविश्वास वाढलाय. राज्यसभेच्या निवडणुकांनंतर आता राज्यात विधानपरिषदेचे पडघम वाजायलाही सुरुवात झालीय.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!