Google Ad
Agriculture News Maharashtra

भिर्रर्रर्रर्र … झाली … लवकरच घुमणार हा आवाज, गाड्यावरील बंदी लवकर उठण्याची आशा?

महाराष्ट्र 14 न्यूज : बैलगाडा शर्यतबंदीवर पुन्हा नव्याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकिट हा मुद्दा गाजला होता. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी दिले.

तसेच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी लवकर व्हावी यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत रणनीती ठरविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.

Google Ad

या बैठकी विषयी डॉ. कोल्हे यांनी ही माहिती दिली. या बैठकीला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!