Google Ad
Editor Choice

राज्याच्या ‘या’ विभागात अजूनही होतोय सर्वात जास्त ऑक्सिजनचा वापर

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना पुणे विभागात मात्र सर्वात अधिक ऑक्सिजनचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते सध्याच्या घडीला संपूर्ण राज्यात पुणे विभागात सक्रीय रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांचा कोरोना रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर अधिक आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाखाच्या खालीच आहे तर पुणे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्यने 1 लाखाचा आकडा ओलांडला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याचा ऑक्सिजनचा वापर 200 मेट्रिक टनांच्या खाली असताना पुण्यातील ऑक्सिजनचा वापर मात्र 500 मेट्रिक टनांहून अधिक असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Google Ad

अन्न आणि औषध प्रशासन विभाग दररोज कोरोना रुग्णालयात प्राणवायूचा राज्यात होणार वापर आणि सध्याचा साठा यावर दैनंदिन अहवाल सादर करत असतो, त्याच्याच 29 एप्रिल, गुरुवारी दिलेल्या अहवालानुसार एका दिवसात संपूर्ण राज्यात 1400.03 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर रुग्णांकरीता करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वात अधिक वापर हा पुणे विभागात करण्यात आला असून तो 575.82 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात इतका वापर का होतोय त्याची कारणे फार सोपी आहेत.

पुणे विभागात मुख्यत्वे करून पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या मोठ्या जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. या पूर्ण विभागात 836 कोरोनाचा उपचार करणारी स्वतंत्र रुग्णालये असून राज्यात सर्वात जास्त रुग्णालय असणार हा विभाग आहे. या विभागातील एकट्या पुणे जिल्ह्यात 416.080  मेट्रिक टन प्राणवायूचा वापर एका दिवसात केला गेला आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!