Google Ad
Editor Choice

घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील या प्रसिद्ध उद्योगपतीला झाली अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मे) : डीएचएफएल आणि येस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली. याप्रकरणी सीबीआयने एप्रिल महिन्यात भोसले यांच्या घरासह स्थावर मालमत्तांची झाडाझडती घेतली होती. त्यानुसार जप्त कागदपत्रांच्या आधारे त्यांना अटक केली आहे.

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ पंपनीचे प्रवर्तक आणि उद्योगपती आहेत. ‘ईडी’ने काही दिवसांपूर्वी पुण्यात भोसले यांच्या कार्यालयासह निवासस्थानी आणि मुंबईत छापा टाकला होता. याप्रकरणी त्यांचा मुलगा अमितचीही चौकशी करण्यात आली होती. मागील वर्षभरापासून भोसले पेंद्रीय यंत्रणांच्या निशाण्यावर होते. त्यानुसार आज सीबीआयने बँक घोटाळा प्रकरणात त्यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत व्यवसायात सहभागी असलेल्या व्यावसायिक भागीदारांवरही छापे टाकण्यात आले होते. सीबीआयने अटकेची कारवाई करण्यापूर्वी 30 एप्रिलला भोसले यांच्या मालमत्ता असलेल्या आठ ठिकाणी छापे टाकले होते.

Google Ad

दरम्यान, ऑगस्ट 2021 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अविनाश भोसले यांच्याशी निगडित चार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. मनी लॉण्डरिंग विरोधी एजन्सीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग कायदा, 2002च्या तरतुदीनुसार मालमत्ता जप्त केली होती. भोसले यांच्याविरुद्ध ‘ईडी’चा मनी लॉण्डरिंगचा खटला पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवान यांच्या विरोधात 2020 मधील एका प्रकरणात भोसले यांना अटक करण्यात आली आहे. कपूर यांनी त्यांच्या मालकीच्या पंपन्यांद्वारे स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अवाजवी फायद्याच्या बदल्यात येस बँकेच्या माध्यमातून डीएचएफएलला आर्थिक साहाय्य देण्यासाठी कट रचला होता. हा घोटाळा एप्रिल ते जून 2018 दरम्यान उघड झाला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!