Google Ad
Editor Choice political party

शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाहीत … त्या आमदारांना अजितदादांनी वेसण घालण्याची गरज  

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्याआरोपांची खैरात झाली होती.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी थेट खेड गाठत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहे. तसेच खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.

Google Ad

याचवेळी त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल, महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असे खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. खेडच्या आमदारांना त्यांनी वेसण घालण्याची गरज आहे.
असंही बोलायला ते विसरले नाहीत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!