Google Ad
Uncategorized

सरकारची मान्यता नसतानाही या शाळा सुरू, पुणे शहरात तब्बल १५ अनधिकृत शाळांची यादी समोर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ नोव्हेंबर): राज्य सरकारची मान्यता नसतानाही हवेली तालुक्यातील १५ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, युडायस क्रमांक प्रदर्शित केले नसल्याचेही दिसून आले आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी निलिमा म्हेत्रे यांनी बुधवारी १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या सर्व शाळांनी शाळेला सरकारची मान्यता नसतानाही, विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, अधिकार नसताना पालकांकडून शुल्क वसुल करून आर्थिक गैरव्यवहार करणे, शासकीय नियमांचे पालन न करणे, विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या पटावर नोंदणी करणे, अन्य शाळांकडुन नियमबाह्यरीत्या दाखला मागणी करणे अशा काही नोंदी म्हेत्रे यांनी नोंदवल्या आहेत. या शाळांनी आरटीई कायदा व स्वयंअर्थसहाय्यित कायदा उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी म्हेत्रे आणि शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Google Ad

पहा या आहेत,अनधिकृत शाळां पुढीलप्रमाणे :

१. नारायणा ई.टेक्नो स्कूल, वाघोली

२. श्रीमती. सुलोचनाताई झेंडे सेमी इंग्लीश स्कूल, कुंजीरवाडी
३. न्यु विज्डम इंटरनॅशनल स्कुल पेरणे फाटा
४. मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदमवस्ती, सोलापूर रोड
५. द टायग्रीस इंटरनॅशनल स्कूल, कदमवस्ती, सोलापूर रोड

६. रामदरा सीटी स्कूल, लोणीकाळभोर
७.स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूल, आव्हाळवाडी, वाघोली
८.विठ्ठल तुपे ई-लर्निंग स्कूल पिंपरी सांडस,
९. रिव्हरस्टोन इंटरनॅशनल स्कूल, पेरणे
१०.ग्यानम ग्लोबल स्कूल उरुळी देवाची
११. कल्पवृक्ष इंग्लिश स्कूल, किरकटवाडी
१२. क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी, खडकवासला,
१३. पुणे इंटरनॅशनल स्कूल, अष्टापूर मळा, लोणीकाळभोर
१४. छत्रभुज नरसी स्कूल, अमनोरा पार्क टाऊन, साडेसतरानळी्, हडपसर
१५. विब्ग्योर स्कूल केसनंद, ता. हवेली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!