कोविड-१९ लसीकरणाच्या, प्रभावी अंमलबजावणीसाठी … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या आहेत उपाय योजना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : कोवीड लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व अनावश्यक गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी, महापालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी, 1 मेपासून कोवीड लसीकरण सुरू आहे. लस पुरवठ्यातील अनियमितता, पहिला डोस व दुसरा डोस यासंबंधी नागरिकांमध्ये असलेला संभ्रम, यामुळे होणारा मनस्ताप टाळणे यासाठी व प्रभावी लसीकरणासाठी पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी
काही उपाययोजना केल्या आहेत.

▶️ या आहेत मार्गदर्शक सूचना :-

1) लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नोंदणी केलेले लाभार्थी वगळता इतरांना शंभर मीटरच्या आत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पण दिव्यांग व जेष्ठ नागरिक आपल्या सोबत एक मदतनीस आणू शकतील.

2) लसीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये दिव्यांग नागरिक प्रथम, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, मग दुसऱ्या डोसचे लाभार्थी, त्यानंतर इतर लाभार्थी. अशा क्रमाने दैनंदित लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

3) कोविशील्ड की कोवँक्सिन यापैकी कोणती लस उपलब्ध आहे. पहिला अथवा दुसरा, कोणता डोस दिला जाणार आहे. याबाबतची माहिती दररोज फलकावर नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

4). दिव्यांग व्यक्तीला आवश्यकतेनुसार व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

5) ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. अशांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण ,प्रभाग स्तरावर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

6)जे लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, त्यांच्या घरी लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.मात्र त्यासाठी ‘मी जबाबदार ‘ या अँपवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे .

7) ज्यांना कोवीड होऊन गेला आहे. त्यांना तीन महिन्यानंतर लस देण्यात येईल

8) सर्व स्तनदा मातांना लस देण्यात येईल.

9) लसीकरणाच्या वेळी कायदा सुव्यवस्था व शिस्तीसाठी पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे.

अशी माहिती प्रवक्ता शिरीष पोरेडी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago