महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ ऑक्टोबर) : देशभरात शनिवारी (दि.१२) विजयादशमीचा उत्सव साजरा झाला. ठिक-ठिकाणी रावण दहन करण्यात आले. राजधानी दिल्लीतही वेगवेगळ्या ठिकाणी रामलीला कार्यक्रम आणि रावण दहन आयोजित करण्यात आले होते. यात पिंपरी चिंचवड शहरही कमी नसल्याचे पहायला मिळाले.
गेल्या नऊ दिवसांपासून संपूर्ण देशात उत्साहाने व भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील पी डब्लू डी मैदानावरील अनेक वर्षाची परंपरा असलेल्या रावण दहनाने आणि महिलांच्या महाभोंडल्याने नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी लोकनेते लक्ष्मण जगताप मित्रपरिवाराच्या वतीने व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, कोयता गँग, अनिष्ट प्रथा, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी, प्रदूषण अशा प्रतीकात्मक रावणाच्या प्रतिमेचे दहन केले गेले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिकानी गर्दीचा उच्यांक केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव यांच्या चांडाळ चौकडीच्या करामती ने तर उपस्थित प्रेक्षकांना अकक्षरशा खेळवून ठेवले, महिलांनी पारंपरिक भोंडला, दांडियाची कला सादर केली, मयूर ग्रुप अकॅडमी च्या कलाकारां उपस्थितांनी वन्स मोर करत डोक्यावर घेतले, तर डी जे च्या तालावर तरुणाई थिरकल्याचे पहायला मिळाले.
तसेच मयूर डान्स अकॅडमीच्या मानसी भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केलेल्या ‘रामयणा’वर आधारित कथ्थक नृत्य तर ‘दम दमा दम’ या रिऍलिटी शोचे विजेते नृत्य कलाकार यांनी तानाजी मालुसरे यांच्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ थीमवर आधारित नृत्य सादर केले. यावेळी महाभोंडला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला ग्रुपला आयोजकांच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आले.
या सर्व कार्यक्रमात उपस्थितामध्ये लाखोंच्या गर्दीत एकच आवाज होता “अब की बार शंकरभाऊ आमदार …”