Google Ad
Uncategorized

नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही – अजित पवार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ डिसेंबर) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत श्रीवर्धन नगरपरिषद पाणीपुरवठा योजना, जल शुद्धीकरण प्रकल्पाचा व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन येथे संपन्न झाला.

शहरातील र ना राऊत महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित सभेत अजित पवार म्हणाले की, कोकणावर निसर्गाची उधळण झालेली आहे. खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी कोकणाला सदैव झुकते माप दिलेले आहे असे अजित पवार म्हणाले.

Google Ad

पुढे ते म्हणाले, कोकणाच्या विकासासाठी कधीही पैसा कमी पडून देणार नाही. स्थानिक पर्यटन वाढीसाठी विविध विकास कामे आपण केलेले आहेत. नुकत्याच महाराष्ट्र बाहेरील राज्यांच्या निकालाने मोदींचे नेतृत्व मान्य केलेले आहे. देशाला नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही असे अजित पवार म्हणाले. त्यासोबत त्यांनी मराठा आरक्षण याविषयी मार्मिक भाष्य करत सांगितले की, आरक्षण मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आंदोलन अहिंसेच्या मार्गाने होणे नितांत आवश्यक आहे.

मी राजकारण करत असताना इतरांसारखी कधीही दिशाभूल केलेली नाही असे सांगत अजित पवारांनी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादी पक्षामधील निर्माण झालेल्या दोन गटांविषयी भाष्य केले. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात आधुनिक पर्वाला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. इंडिया आघाडीची पहिली सभा श्रीवर्धनमध्ये झाली. मी व माझे सर्व सहकारी धर्मनिरपेक्ष विचाराचे पाईक आहोत.

स्थानिक नागरिकांना मोठ्या स्वरूपात रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या श्रीवर्धन शहराला ऐतिहासिक वारसा असलेल्या पेशवे मंदिराबाबत सरकार सकारात्मक आहे. चक्रीवादळ प्रसंगी निर्माण झालेल्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्याच्या हेतूने शासनाने ठोस पावले उचललेली आहेत.

सदरच्या सभेचे प्रास्ताविक विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. सभेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, उमा मुंडे, सायली दळवी, गणेश पोलेकर, हिदायत कुदरते, अबू राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि श्रीवर्धन मतदारसंघातील जवळपास आठ हजार नागरिकांनी सभेला उपस्थिती दर्शवली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!