Google Ad
Editor Choice Maharashtra

Ahamadnagar : कोरोना रुग्णांची सेवा करताना कोविड सेंटरमध्येच झोपला हा युवा आमदार

महाराष्ट्र 14 न्यूज : मागील वर्षी कोरोनाची निर्माण झालेली परिस्थिती पेक्षा या वर्षी ची परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे. अशाच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अकराशे रुग्णांची क्षमता असणारे कोविड सेंटर सुरू केले आहे.

त्यांच्या अहोरात्र सुरू असणाऱ्या कार्याची दखल उभ्या महाराष्ट्रात घेतली जात आहे. माझ्या माणसांच्या साठी मी राबनार नाही तर कोण राबेल असे म्हणत अविरत कष्ट करणारे नेतृत्व म्हणून निलेश लंके यांना ओळखले जाते.

Google Ad

माणसं जगली पाहिजेत या भूमिकेने ते अहोरात्र काम करत आहेत. दिवसाच्या सरते शेवटी, व रात्री एक ते दिड वाजता ऑक्सीजन कोणाला कमी आहे का? काही समस्या आहे का ? हे सर्व स्वतः लक्ष देऊन आमदार निलेश लंके पाहत आहेत. रुग्णांना धीर देण्या साठी कोविड सेंटर मध्येच जेवण करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.

कोरोनाच्या भीतीने अनेक बडे बडे नेते आपली आणि आपल्या कुटूंबियांची काळजी घेताना दिसत आहेत. तर रुग्णांची सेवा करत तिथेच कार्यकर्त्यां समवेत काळजीपोटी झोपणारा हा आमदार मनात घर करत आहे. आ. निलेश लंके यांच्या माणुसकीचे दर्शन सर्वांना होताना दिसत आहे. लोकांच्या साठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या या आमदाराचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!