Google Ad
Editor Choice

Pune : खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून) : खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार preeti 3 तासांपूर्वी २६३ जणांनी पाहिले मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचत असताना खुन्नस दिल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे . 8 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याच्या कात्रजमधील संतोषनगर येथे ही घटना घडली . याप्रकरणी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली .

जावेद मेहबुब मुल्ला ( 27 ) आणि तौफिक लाला शेख ( 29 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत . तर सुनील पांडव ( 19 ) असे जखमीचे नाव आहे . सुनील आणि सार्थक त्यांच्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून संतोषनगरमध्ये येत होते . त्यावेळी जुन्या वादातून जावेदने सुनीलला अडवून तु मला नाचताना खुन्नस का दिली होती , असा जाब विचारला .

Google Ad

त्यानंतर काही कळायच्या आतच हातातील कोयत्याने सुनीलवर वार करून गंभीररित्या जखमी केले . यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहेत , आमच्या नादाला लागलास तर खल्लास करू अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली . याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे अधिक तपास करत आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!