Google Ad
Editor Choice

ध्येयवादी, जनसामान्यांचा लोकनेता हरपला … भाऊंनी केलेले काम हे शहरवासियांच्या कायम स्मरणात राहिल – अजित गव्हाणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०३ जानेवारी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी गेली 35 वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे आणि समाजनिष्ठ, ध्येयवादी जनसामान्यांचे लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज 59 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाऊंना श्रद्धांजली वाहिली.

भाऊंनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जिवनात काम करताना पिंपरी-चिंचवड शहराच्या यशस्वी वाटचालीत भरीव आणि मोलाचे योगदान दिले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा ध्येयवादी लोकप्रतिनिधी आज आपण गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना त्यांनी शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भाऊंनी केलेले काम हे शहरवासियांच्या कायम स्मरणात राहिल. ध्येयवादी आणि संवेदनशील नेत्याच्या निधनाने पिंपरी-चिंचवड शहराची अपरिमित हानी झाली आहे. जगताप कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!