महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑगस्ट) : मुंबई शहरातील शीव रेल्वे स्थानकावर एका किरकोळ वादातून मारहाण झालेल्या प्रवाशाला आपले प्राण गमवण्याची दुर्देवी वेळ आली. मारहाणीमुळे रेल्वे रुळावर पडलेल्या प्रवाशाला धावत्या लोकलने उडवले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे. दिनेश राठोड ( वय २६ ) असे या मृत प्रवाशाचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे .
मुंबई हे गर्दीचे शहर म्हणून ओळखले जाते. रेल्वे स्थानकावर तर प्रचंड गर्दी असते. या गर्दीत एकमेकांना धक्का लागतो. परंतु त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. मात्र काही वेळा या धक्काधक्कीचे पर्यवसन हाणामारीत देखील होऊ शकते. शीव रेल्वे स्थानकावर अशीच धक्काधक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर झालेली मारहाण २६ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतली. दिनेश राठोड (वय २६) या तरूणाचा धक्का रेल्वे स्टेशनवरच उभ्या असलेल्या शीतल माने (वय ३०) यांना लागला. त्यानंतर या महिलेसह तिचा पती अविनाश माने (वय ३१) यांची दिनेश सोबत बाचाबाची झाली.
कारण त्याचा शितल माने या महिलेला धक्का लागला. हा धक्का चुकीच्या पद्धतीने लावला असल्याचा आरोप करत पती-पत्नीने राठोड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत राठोड रेल्वे रुळावर पडला. दुर्देवाने त्याचवेळी, माटुंगा स्थानकावरून आलेल्या लोकलने दिनेश राठोडला उडवले. या अपघातात जखमी झालेल्या दिनेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दिनेश राठोड हा बेस्टमध्ये वाहक पदावर काम करत होता. अविनाश माने आणि त्याची पत्नी शीतल माने हे दोन्ही कोल्हापूरमधील रहिवासी असून ते दादरहून शीव रेल्वे स्टेशनवर आले होते, त्याच वेळी दिनेश राठोड हा जिन्यावरून फलाट क्रमांक १ वर आला. त्यावेळी शीतल माने या महिलेला त्याचा धक्का लागला. त्यामुळे कोल्हापूरच्या या महिलेने त्याला रागाच्या भरातच छत्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तिच्या पतीनेही राठोडला मारहाण केली.
या गोंधळात तो रुळांवर पडला. रुळावर पडलेल्या दिनेश राठोडने फलाटावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याला लोकलने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवध केल्याच्या आरोपाखाली पती-पत्नींना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…