महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ मार्च) : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी आहेत. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. बुधवार दि. २९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, गिरीश बापटांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वैकुंठस्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात ते सक्रिय होते. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…